Payment : ‘या’ अजब नोकरीकरिता वार्षिक 88 लाख रु. पगार | पुढारी

Payment : ‘या’ अजब नोकरीकरिता वार्षिक 88 लाख रु. पगार

बर्लिन : जर्मनीतील कान्नामेडिकल नावाच्या फार्मा कंपनीला ‘प्रोफेशनल स्मोकर्स’ची गरज असून, या अजब नोकरीसाठी भारतीय चलनात म्हणाल तर तब्बल 88 लाखांचा पगार वार्षिक दिला जाणार आहे. नोकरीच्या जाहिरातीनुसार, प्रोफेशनल स्मोकर्सला गांजा ओढून त्याची गुणवत्ता तपासायची आहे. ‘द सन’ने याबाबत वृत्त दिले आहे. ही कंपनी गांजाची औषध म्हणून विक्री करते. उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांना प्रोफेशनल गांजा स्मोकरची गरज आहे. (Payment )

Payment : प्रोफेशनल स्मोकर्स

याबाबत कंपनीचे सीईओ डेव्हिड हेन म्हणाले, आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जो ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल, मॅसेडोनिया आणि डेन्मार्क या देशांमध्ये आमच्या उत्पादकांची गुणवत्ता तपासू शकेल. तसेच त्याला जर्मनीमध्ये डिलिव्हरी केलेल्या उत्पादनांची गुणवत्तादेखील तपासावी लागेल. गेल्या वर्षी जर्मनीत गांजा फुकायला कायदेशीर परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करणारी व्यक्ती कॅनॅबिस पेशंट असणे बंधनकारक ठरवण्यात आले आहे. तसेच, त्याच्याकडे जर्मनीमध्ये कायदेशीररीत्या गांजा ओढण्याचा परवाना असणेदेखील आवश्यक आहे. सांगायचा मुद्दा असा की, या नोकरीसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button