Mahashivratri : उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त १८.८२ लाख दिवे प्रज्वलित; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद | पुढारी

Mahashivratri : उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त १८.८२ लाख दिवे प्रज्वलित; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पुढारी ऑनलाईन : (Mahashivratri) देशभरात शनिवारी महाशिवरात्रीचा उत्त्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त अनेक शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात महाशिवरात्रीनिमित्त क्षिप्रा नदीच्या काठावर १८.८२ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये करण्यात आली आहे. हे दिवे लावण्याचे काम शनिवारी २० हजार स्वयंसेवकांनी पूर्ण केले. घाटांवरील विद्युत दिवे बंद करून पारंपारिक मातीच्या दिव्यांच्या उजेडात क्षिप्रा नदीचा किनारा न्हाऊन निघाला होता. या दरम्यान एक लेझर शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.

याबाबत बोलताना गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स टीमचे स्वप्निल डांगरीकर म्हणाले की, यापूर्वी दीपावलीनिमित्त आयोध्यामध्ये १५.७६ लाख दिवे प्रज्वलित करण्याचा विश्व रेकॉर्ड करण्यात आला होता. उज्जैनमध्ये शनिवारी १८.८२ लाख दिवे प्रज्वलित करून हा विश्व विक्रम तोडण्यात आला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे डांगरीकर यांच्या मते हे दिवे कमीत कमी पाच मिनिटे जळायला हवे होते. हे काम यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमाचे आयोजन प्रशासनबरोबर स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. ( mahashivratri)

या उपक्रमाचे वर्णन शून्य कचरा उपक्रम म्हणून करण्यात आले आहे. या उपक्रमास मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही उपस्थिती दर्शवली होती. यावेळी १८ लाख ८२ हजार २२९ दिवे यावेळी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी पत्नी साधना सिंह चौहान यांच्यासोबत बोटीवर बसून रामघाट ते भुकीमातापर्यंत लावलेल्या दिव्यांची अप्रतिम छटा पाहण्याचा आनंद घेतला.      (Mahashivratri)

                हेही वाचलंत का ? 

Back to top button