माले : निसर्गसौंदर्याने नटलेला मालदिव हा देश म्हणजे विविध बेटांचा समूह होय. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Maldives Islands) हा देशसुद्धा पृथ्वीच्या उदरात गडप होणार की काय, अशी शंका साधार उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळेच शक्य तेवढ्या लवकर तेथील काही बेटांची उंची कृत्रिमरीत्या वाढविण्याचा सल्ला ब्रिटनमधील साऊथम्प्टन विद्यापीठाने दिला आहे. त्यावर तेथील सरकारने गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली आहे.
सध्याच्या परिस्थितीचा विचार केला, तर मालदिवमध्ये केवळ दोनच बेटांवर (Maldives Islands) मानवी वस्ती दिसून येते. अन्य बेटे निर्मनुष्य आहेत. जर भविष्यात मानवी वस्तीसाठी जागा कमी लागली, तर या बेटांची उंची वाढविण्याला पर्याय नाही. प्रा. रॉबर्ट निकोल्स यांच्या मते, समुद्राची पातळी ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत चालली आहे. त्यामुळे एक दिवस असा येईल की, तेव्हा मालदिवमधील बहुतांश बेटे सागराने गिळंकृत केलेली असतील. या समस्येवर आतापासूनच काम करणे आवश्यक आहे. मात्र, बेटांची उंची वाढविणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. त्यातही अनंत अडथळे आहेत. त्यामुळे मालदिव सरकार काळजीत पडले आहे.
हेही वाचा :