ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्‍खलनामुळे २४ लोकांचा मृत्‍यू | पुढारी

ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्‍खलनामुळे २४ लोकांचा मृत्‍यू

ब्राझीलिया ; पुढारी वृत्‍तसेवा दक्षिणपूर्व ब्राझीलच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्‍यामुळे दक्षिणपूर्व भागात मोठ्यात प्रमाणात पूर आला आहे. त्‍यातच झालेल्‍या भूस्खलनामुळे किमान 24 लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेघर झाले आहेत. प्रशासनाकडून बचाव कार्य चालू आहे, असे रॉयटर्सने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

ब्राझीलच्या सर्वात श्रीमंत राज्य साओ पाउलो राज्य सरकारने किनारपट्टीवर 600 मिलिमीटर (23.62 इंच) पेक्षा जास्त पावसामुळे 19 मृत्यू आणि 566 बेघर किंवा बेघर झाल्याची पुष्टी केली. येथील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येथील किनारी भागात मुसळधार पाऊस सुरू राहील, बचाव कर्मचार्‍यांना आव्हान करण्यात येत आहे. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता येथील प्रशासनाने दिले आहे.

हेही वाचा: 

Back to top button