Teddy Bear : जगातील सर्वात मोठा टेडी! | पुढारी

Teddy Bear : जगातील सर्वात मोठा टेडी!

मेक्सिको सिटी : व्हॅलेंटाईन वीकमध्ये नुकताच टेडी बियर (Teddy Bear) डेही साजरा झाला. मात्र, जगातील सर्वात मोठा टेडी कुठे बनवला होता हे तुम्हाला माहिती आहे का? लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोमधील जोनाकातलान येथे असा सर्वात मोठा टेडी बियर बनवण्यात आला होता. हा टेडी 63 फूट आणि 8 इंच लांबीचा आणि तब्बल 4 टन वजनाचा होता.

हा टेडी बियर (Teddy Bear) 28 एप्रिल 2019 मध्ये जनतेसमोर आणण्यात आला. तीन वेगवेगळ्या नगर पालिकांनी एकत्र येऊन हा मोठा टेडी बनवला होता. त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्येही करण्यात आली. या टेडी बियरला ‘झोनिता’ असे नाव देण्यात आले होते.

जगातील सर्वात पहिला टेडी बियर (Teddy Bear) अमेरिकेतील ब्रुकलिन शहरातील एक दुकानदार मॉरिस मिकटॉम यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने बनवला होता. जुने कपडे आणि अन्य काही वस्तूंपासून त्यांनी हे सुंदर, मुलायम खेळणे बनवले. त्याला त्यांनी अस्वलाला शिकारीपासून वाचवणार्‍या प्रेसिडंट रुझवेल्ट यांचे ‘टेडी’ हे नाव दिले होते. ‘टेडी’ हे रुझवेल्ट यांचे ‘निकनेम’ म्हणजेच घरगुती टोपण नाव होते.

हेही वाचा : 

Back to top button