अंकारा : तुर्की आणि सिरियाला बसलेल्या विनाशकारी भूकंपाच्या (Turkey Earthquake) धक्क्यात मोठमोठ्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्या. या संकटात सुमारे 25 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. अजूनही ढिगार्याखाली लोक सापडताहेत. अशा लोकांना शोधण्यासाठी तुर्की आणि सिरियात नव्या उपकरणांचा शोध घेण्यात येत आहे. ही उपकरणे ढिगार्यांखाली अडकलेल्या लोकांसाठी वरदान ठरू लागली आहेत.
अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांची अचूक माहिती मिळते. (Turkey Earthquake) ही उपकरणे जखमी, जिवंत अथवा मृत आहे, याची माहिती देण्यासही सक्षम आहेत. सध्या या भूकंपग्रस्त देशांमध्ये ढिगारे हटवण्यासाठी मोठमोठ्या यंत्रांची मदत घेण्यात येत आहे. याच ढिगार्यांमध्ये कोणी जिवंत अथवा मृत आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. यासाठी खास उपकरणांचा वापर केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने साऊंड डिव्हाईसचावापर केला जात आहे. या उपकरणाच्या मदतीने काही मीटर अंतरावर सूक्ष्म आवाज येत असला, तरी तो रेकॉर्ड केला जातो.
याच आवाजाच्या मदतीने संबंधिताला ढिगार्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. या महत्त्वपूर्ण साऊंड डिव्हाईसमध्ये कार्बन डायॉक्साईड डिटेक्टरचा वापर करण्यात आला आहे. ढिगार्याखाली लोक अडकल्याची शक्यता आहे, असे वाटताच तेे हे साऊंड डिव्हाईस नेले जाते. (Turkey Earthquake) मातीच्या ढिगार्याखाली एखादी व्यक्ती आहे आणि जिवंत तर आहे पण बेशुद्ध पडली आहे. अशा स्थितीत थोडीशी जरी हालचाल झाली, तर हे उपकरण तातडीने सिग्नल देते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या शोधकार्याला सुरुवात होते. तुर्की आणि सिरियात या उपकरणाच्या मदतीने अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात येत आहेत. अशा लोकांची संख्या वाढत आहे.
हेही वाचा :