Toilet water recycle : टॉयलेटचे पाणी रिसायकल करून देणारे रेस्टॉरंट

लंडन : मॉल्स, दुकाने आणि इतर इमारतींमध्ये वापरल्या जाणार्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. काही वर्षांपूर्वी बेल्जियममधील एक रेस्टॉरंट पाण्याच्या पुनर्वापरामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हे रेस्टॉरंट नळाचे नाही तर टॉयलेटमधील (Toilet water recycle) पाण्याचा पुनर्वापर करते. बेल्जियममधील कुरेन येथे गुस्टो नावाचे हे रेस्टॉरंट आहे. येथे ग्राहकांना दिले जाणारे पाणी अगदी सामान्य पाण्यासारखे आहे. सामान्य पाण्याप्रमाणेच त्याला चव किंवा रंग नाही. तरीदेखील हे पाणी सामान्य पाण्यापेक्षा वेगळे आहे. कारण, हे रेस्टॉरंटच्या टॉयलेटमधून जमा केलेले आहे. या रेस्टॉरंटमध्ये टॉयलेटमधील पाणी जमा करून ते रिसायकल केले जाते.
हे रेस्टॉरंट टॉयलेटमधून (Toilet water recycle) गोळा केलेले पाणी इतके स्वच्छ बनवते की, ते ग्राहकांना देण्यायोग्य बनते. हे बेल्जियन रेस्टॉरंट सीवर सिस्टीमला जोडलेले नाही. अशा परिस्थितीत टॉयलेट आणि वॉश बेसिनमधून बाहेर पडणारे पाणी गोळा करून त्याचा पुनर्वापर करणे हा एकमेव पर्याय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टॉयलेट (Toilet water recycle) आणि सिंकचे पाणी आधी प्लांट फर्टिलायझरच्या मदतीने स्वच्छ केले जाते. त्यानंतर काही पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून बाथरूममध्ये पुरवले जाते जेणेकरून टॉयलेट फ्लश करता येईल. उर्वरित पाणी शुद्धीकरणाच्या पाच टप्प्यांतून जाते त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य होते. रेस्टॉरंटमध्ये येणारे ग्राहक हेच शुद्ध पाणी पितात.
हेही वाचा :
- मोठी बातमी : ईडीच्या रडारवर आता पुणे महापालिका! जम्बो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू
- Maghi Ganesh Festival : माघी गणेशजयंती निमित्त श्रींच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे आख्यायिका…