Space : ५० हजार वर्षांत प्रथमच अंतराळात अनोखे द़ृश्य | पुढारी

Space : ५० हजार वर्षांत प्रथमच अंतराळात अनोखे द़ृश्य

नवी दिल्ली : अंतराळातील Space )गूढ घटना आपल्याला नेहमीच विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आपल्या दुर्बिणी सरसावून ब्रह्मांडाचा वेध अहोरात्र घेण्यात मग्न असतात. अंतराळातील Space ) गोष्टींबाबत आवड असणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच असे अंतराळात एक अशी घटना घडणार आहे जी अत्यंत रंजक असणार आहे.

Space)एक विशाल धूमकेतू सूर्याजवळून जाऊन नंतर पृथ्वीच्याही अत्यंत जवळून जाणार आहे. हा धूमकेतू पृथ्वीच्या इतक्या जवळून जाईल की, तुम्ही डोळ्यांनी त्याला पाहू शकाल. तो 1 फेब्रुवारीला पृथ्वीजवळून जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला हे द़ृश्य पाहायचे असेल तर तुम्ही टेलिस्कोपने त्याला आणखी जवळून पाहू शकाल. हा धूमकेतू 50 हजार वर्षांत पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार आहे.

त्या दिवशी पूर्ण चंद्राचा लख्ख प्रकाश पडणार असेल तर मात्र हा धूमकेतू दिसणे कठीण आहे. त्याचा शोध अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या ज्विकी ट्रांझीएंट फॅसिलीटीने लावला आहे. याला पहिल्यांदा गेल्या वर्षी मार्च महिन्यात गुरू ग्रहाजवळून जाताना पाहण्यात आले होते. या धूमकेतूचे नामकरण ‘सी 2022 इ थ्री’ असे करण्यात आले आहे. बर्फ, गॅस आणि दगड यांच्यापासून तो बनलेला असतो आणि त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित होतो, असे खगोल शास्त्रज्ञ निकोलस बीवर यांनी म्हटले आहे.

उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या अखेरच्या धूमकेतूपेक्षा तो लहान आहे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तो मार्च 2020 मध्ये पृथ्वीजवळून गेला होता. तर हॅले बॉप हा 60 किलोमीटर व्यास असलेला धूमकेतू 1997 मध्ये दिसला होता. त्यापेक्षा हा नव्याने दिसणारा धूमकेतू लहान असणार आहे. तथापि, तो अधिक प्रकाशमान असेल असे खगोलतज्ज्ञ सांगत आहेत. त्यातून निघणारा प्रकाश हा रात्रीतही दिवसाचा अनुभव देईल. उत्तर गोलार्धात सकाळच्या वेळी तो आकाशात दिसेल. हा धूमकेतू उर्ट क्लाऊड येथून येत असल्याचे मानले जात आहे. हे सूर्यमालेच्या चौफेर असलेले एक विशाल क्षेत्र असून तिथे रहस्यमयी बर्फाच्या वस्तू आहेत.

-हेही वाचा

हा माणूस आहे की रबर? हवे तसे वळवतो शरीर!

Lottery : भेट मिळालेल्या लॉटरी तिकिटाला लागले बक्षीस!

Back to top button