Robot : जगातील पहिला अनोखा कॅफे रोबोच करणार सगळी कामे | पुढारी

Robot : जगातील पहिला अनोखा कॅफे रोबोच करणार सगळी कामे

दुबई : जगभरात अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. मानवाने अशा रोबोंची (Robot) निर्मिती केली आहे, जे भविष्यात मानवाप्रमाणे सर्व कामं करू शकतात. मनुष्य आज जी कामं करू शकतो कदाचित त्याहूनही सफाईदार कामं हे (Robot)रोबो भविष्यात करू शकतील. त्यामुळे आगामी काळात माणसाच्या जागी रोबो काम करताना दिसले, तर आश्चर्य वाटू नये. आता दुबईमध्ये जगातील पहिला आणि एकमेव पूर्णपणे रोबोटिक ऑपरेटेड असा कॅफे लवकरच सुरू होत आहे.

या कॅफेची खासियत म्हणजे तो 24 तास खुला असेल आणि त्यामध्ये एकही मनुष्य काम करणार नाही. म्हणजेच तुमची कॉफी बनवण्यापासून ते तुम्हाला कॉफी सर्व्ह करण्यापर्यंतची सगळी कामं रोबोच करतील. दुबईमध्ये उघडण्यात येणारा हा कॅफे जगातील पहिला कॅफे मानला जाईल, जिथे कोणत्याही माणसाशिवाय संपूर्ण कॅफे फक्त रोबोच चालवणार आहेत. त्याचे नाव डोना सायबर कॅफे असेल. तेथे काम करणारे रोबो आधुनिक सुपरमॉडेल असणार आहेत.

या कॅफेत तुम्हाला कॉफी, आइस्क्रीम आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स मिळतील. हे खास सुपरमॉडेल रोबो कॅफेमध्ये येणार्‍या ग्राहकांची विशेष काळजी घेण्याच्या द़ृष्टीने तयार करण्यात आले आहेत. कॅफेत बसून कोणत्याही ग्राहकाला कंटाळा आला तर हे सुपरमॉडेल रोबो त्याला रंजक किस्से सांगून मनोरंजन करतील. शिवाय हे रोबो ग्राहकांच्या भावना समजून घेण्यासही सक्षम आहेत. म्हणजेच तुमचे हावभाव पाहून तुमचा मूड कसा आहे हे या त्यांना सहज कळू शकेल.

संबंधित बातम्या

डोना सायबर कॅफेच्या निर्मात्यांनी या सुपरमॉडेल रोबोबद्दल मीडियाला सांगितले की, रोबो बनवण्यासाठी त्याचे भाग रशियामधून आयात करण्यात आले आहेत. या सुपरमॉडेल रोबोचे वैज्ञानिक भाषेतील सध्याचे नाव रोबो-सी2 असे आहे. हा रोबो आरडीआय रोबोटिक्सने बनवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सुपरमॉडेल रोबो महिलेसारखा दिसतो आणि याचे हावभावही महिलेसारखे आहेत.

.हेही वाचा

Space : ५० हजार वर्षांत प्रथमच अंतराळात अनोखे द़ृश्य

Ice and Snow Festiva : चीनच्या हार्बिन शहरात बर्फाची नवलाईची नगरी

Back to top button