पैसे मोजा अन् नाकावाटे घ्या लस! दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोसही नाकावाटे घेण्याचा पर्याय | पुढारी

पैसे मोजा अन् नाकावाटे घ्या लस! दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोसही नाकावाटे घेण्याचा पर्याय

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : कोविडपासून संरक्षणासाठी कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसींनंतर आता इन्कोव्हॅक ही नाकावाटे घेता येणारी लस उपलब्ध झाली आहे, शासनाने खासगी रुग्णालयांत ही लस उपलब्ध केली असून, नागरिकांना पैसे मोजून हीलस घेता येईल.

शासनाने अद्याप यासाठीचे शुल्क जाहीर केलेले नाही, जगातील चीन, जपान, अमेरिका यासह अनेक देशांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती पाहता, केंद्र व राज्य शासनानेही आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य यंत्रणेद्वारे कोरोना चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात येत आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड या लसी उपलब्ध झालेल्या आहेत. इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाते. अनेकांना इंजेक्शनची भिती असल्याने, त्यांनी ही लस घेतलेली नाही. मात्र आता नाकावाटे लस शासनाने उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांवरील सर्वांना ही लस घेता येईल. तसेच यापूर्वी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही बूस्टर डोससाठी नाकावाटे लस घेता येणार आहे.

Back to top button