

बंगळूर : कधी कधी काही अनाहूत पाहुणे आपल्या शरीरात येतात आणि ठाण मांडून बसतात. त्यांना तिथून हुसकावून लावणेही कठीण होऊन बसते. कानात किंवा नाकात किडे जाण्याचे तर प्रकार अनेकवेळा जगभरातील अनेक लोकांबाबत घडलेले आहेत. आताही अशाच एका प्रकाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तिच्या कानात एक कोळी (Spider) घुसला होता!
हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला घरी दुपारी झोपली असताना, तिच्या कानात एक कोळी (Spider) शिरला होता. हा कोळी शिरल्यानंतर तिला कानात दुखायला लागले होते. तिने कान बोटांनी तपासले; मात्र तिच्या हाताला काहीच लागले नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांनी टॉर्च लावूनदेखील कानात पाहिले; मात्र त्यांना कानात काहीच दिसले नाही. या महिलेला दररोज कानात दुखायचे. हे दुखणे दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे तिचा पती बंगळूरच्या एका हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेला.
तिथे डॉक्टरांनी स्पेशल कॅमेर्याने कानाची तपासणी केली असता, कानात जे होते ते पाहून त्यांनादेखील धक्का बसला! या महिलेच्या कानात एक छोटा कोळी (Spider) बसलेला त्यांना दिसला. महिलेच्या दुखण्याचे कारण हा कोळी ठरला होता. डॉक्टरांनी मोठ्या कष्टाने हा कोळी बाहेर काढला आणि महिलेच्या जीवात जीव आला.
हेही वाचा :