कतारमधील मजुरांचे मृत्यू दडपण्यासाठी खासदारांना लाच

कतारमधील मजुरांचे मृत्यू दडपण्यासाठी खासदारांना लाच
Published on
Updated on

ब्रुसेल्स : वृत्तसंस्था : कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्ड कप सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. आता तो संपुष्टाकडे असताना युरोपियन खासदारांनी कोट्यवधींची लाच स्वीकारल्याचा आरोप होत आहे. वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या बांधकामांत मोठ्या संख्येने झालेल्या मजुरांचे मृत्यू दडपण्यासाठी ही लाच दिली गेली आहे. मृतांत भारतीय मजूरही लक्षणीय प्रमाणात आहेत.

एका वृत्तानुसार भारतातील सहा हजार मजूर कतारमध्ये मरण पावले आहेत. बेल्जियम पोलिसांनी युरोपियन संसदेच्या एका सदस्याच्या ब्रुसेल्स येथील निवासस्थानी छापा घातला आणि 8 कोटी रुपये जप्त केले. वर्ल्ड कपच्या तयारीत मजुरांच्या मृत्यूसह अनेक घपले दडपण्यासाठी त्यांनी कतारकडून कोट्यवधींची लाच घेतली. एवा कायली असे या सदस्याचे नाव असून तो ग्रीसमधून निवडून आलेला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. इटलीतील अँटोनियो पंजेरी या सदस्याच्या घरावरील छाप्यात पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांची 87 लाख रुपये खर्चाची एक कौटुंबीक सहल कतार सरकारने प्रायोजित केल्याचेही उघडकीला आले आहे.

अ‍ॅम्नेस्टीच्या 2022 च्या अहवालानुसार कतारमध्ये गेल्या 10 वर्षांत 15 हजार 21 अप्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात 2 हजार 711 मजूर भारतातील आहेत. यानंतर आलेल्या वृत्तानुसार फिफा वर्ल्ड कपसाठी करण्यात आलेल्या विविध बांधकामांवरील 6 हजार 500 वर मजुरांचा मृत्यू झालेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news