Insomnia : अनिद्रेमुळे वाढतो काचबिंदूचा धोका | पुढारी

Insomnia : अनिद्रेमुळे वाढतो काचबिंदूचा धोका

लंडन : रात्री पुरेशी झोप (Insomnia)_न घेणे किंवा अनिद्रेची समस्या तसेच दिवसा झोपणे याचा डोळ्यांवरही विपरित परिणाम होत असतो. दीर्घकाळ ही समस्या राहिल्यास ग्लूकोमा म्हणजेच काचबिंदू होण्याचा धोका वाढतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

ग्लुकोमामुळे द़ृष्टी गमावल्यास ती परत मिळू शकत नाही. संशोधकांनी म्हटले आहे की भरपूर किंवा पुरेशी झोप न (Insomnia) घेतल्यास ही समस्या कोणत्याही वयाच्या लोकांना होऊ शकते. वृद्ध लोकांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये धूम्रपानामुळे ही समस्या अधिक निर्माण होते. ‘बीएमजे ओपन जर्नल’मध्ये प्रकाशित संशोधनात ब्रिटनच्या बायोबँकेच्या अध्ययनात भाग घेणार्‍या चार लाखांपेक्षा अधिक लोकांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. या पाहणीत 40 ते 69 वर्षे वयोगटातील लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्या झोपण्याच्या सवयीबाबतही माहिती घेण्यात आली. 2010 ते 2021 पर्यंत चाललेल्या या पाहणीत ग्लुकोमाच्या 8,690 प्रकरणांची नोंद झाली.

आकडेवारीच्या आधारे संशोधकांना आढळले की चांगली झोप (Insomnia) घेणार्‍या लोकांच्या तुलनेत दिवसा झोप घेणार्‍या लोकांमध्ये ग्लुकोमाची जोखिम 11 टक्के अधिक असते. तसेच अनिद्रा आणि छोटी किंवा दीर्घकाळ झोप घेणार्‍या लोकांमध्ये ही जोखिम 13 टक्क्यांपर्यंत वाढते. चांगली झोप न झाल्याने निर्णयक्षमता, स्वभाव, शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीवरही विपरित परिणाम होतो असे दिसून आले. 2040 पर्यंत जगभरात 11.2 कोटी लोक ग्लुकोमाग्रस्त होऊ शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button