फ्लोरिडा; वृत्तसंस्था : अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कंटाळा आला, म्हणून चोरी (Robbery) केल्याचे सांगितले. त्याचे कारण ऐकूण पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला गॅस स्टेशन आणि बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी अटक केली.
४५ वर्षीय आरोपी डकैत निकोलस झापाटरने दरोडा (Robbery) टाकताना काळी पोलिस टोपी आणि चष्मा घातलेला होता. त्याने पहिला दरोडा ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास एका बँकेत केला. दरोडा टाकत असताना निकोलसने चिठ्ठीवर एसॉल्ट आणि मनी लिहिले ती नोट तेथील कर्मचाऱ्याला दिली.
पहिल्या चोरीनंतर दोन स्टेशनवर पोहोचला. तेथील दिवसांनी त्याने दुसरी चोरी (Robbery)केली. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास तो एका गॅस कारकुनाला एक चिठ्ठी दिली. ज्यावर सर्व पैसे आणि दोन सिगारेट मला द्या, असे लिहिले होते. कंटाळून आला होता, त्यामुळे दरोडा टाकला असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
हेही वाचा :