

मुंबई : भारताच्या पहिल्या रोबोटिक ऑप्टिकल रिसर्च टेलिस्कोपने कृष्णविवराकडून (Black hole) गिळंकृत होत असलेल्या एका तार्याला टिपून घेतले आहे. त्यामधून निघणारा प्रकाश यामध्ये कैद झाला आहे. त्याला 'ऑप्टिकल फ्लेयर' असे म्हटले जाते. याबाबतची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
'आयआयटी बॉम्बे'तील अॅस्ट्रोफिजिसिस्ट वरुण भालेराव यांनी सांगितले की ज्यावेळी कृष्णविवर आणि तार्याचा आमना-सामना झाला त्यावेळी हा तारा तसाही मृत्यूच्या मार्गावरच होता. या चकमकीत कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने तार्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे कृष्णविवराच्या (Black hole) आसपास विखुरले गेले आणि एका चकतीप्रमाणे त्याच्या चारही बाजूंनी फिरू लागले. या घटनेला 'टायडल डिसरप्शन इव्हेंट' (टीडीई) असे म्हटले जाते.
या टेलिस्कोपचे नाव 'ग्लोबल रिले ऑफ ऑब्झर्व्हेटरीज वॉचिंग ट्रांजिएंटस् हॅपन' (ग्रोथ) असे आहे. (Black hole) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेने एकत्रितपणे या टेलिस्कोपची निर्मिती केली आहे. हा टेलिस्कोप लडाखमध्ये सरस्वती पर्वतावर समुद्रसपाटीपासून 4500 मीटर उंचीवर आहे. त्याचे प्रमुख लक्ष्य टाईम-डोमेन अॅस्ट्रॉनॉमी हे आहे.
त्याचा अर्थ ब्रह्मांडात होणार्या स्फोटांचे व त्यामागील कारणांचे अध्ययन करणे. आता जी घटना या टेलिस्कोपने टिपली आहे तिला 'एटी 2022 सीएमसी' असे नाव देण्यात आले आहे. (Black hole) एकदम निर्माण होऊन हा प्रकाश लुप्त होत होता असे संशोधकांनी म्हटले आहे. ही घटना पृथ्वीपासून 8.5 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर झाली आहे.
हेही वाचा :