Sundar Pichai | Google चे सीईओ सुंदर पिचाई यांचा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्काराने सन्मान | पुढारी

Sundar Pichai | Google चे सीईओ सुंदर पिचाई यांचा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

पुढारी ऑनलाईन : गुगल, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्या हस्ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पिचाई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


याप्रसंगी राजदूत तरनजीत एस संधू म्हणाले, आज गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान करताना आनंद होत आहे. मदुराई ते माउंटन व्ह्यू हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास भारत-अमेरिका आर्थिक आणि तांत्रिक संबंध मजबूत करतो. जागतिक संबंध, नवोपक्रम भारतीय प्रतिभेच्या योगदानाची पुष्टी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारत सरकार आणि जनतेचे मानले आभार

या सन्मानाला उत्तर देताना पिचाई म्हणाले, या उच्च सन्मानासाठी मी भारत सरकार आणि भारतातील जनतेचा खूप आभारी आहे. भारत हा माझा एक भाग आहे. तंत्रज्ञानाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र काम करत असताना Google आणि भारत यांच्यातील उत्तम भागीदारी सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button