Milk : दुधाबरोबर खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ.. | पुढारी

Milk : दुधाबरोबर खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ..

नवी दिल्ली ः दुधाला (Milk) आपल्याकडे ‘पूर्णान्न’ असे म्हटले जाते व ते योग्यही आहे. दुधामधून आपल्याला अनेक पोषक घटक मिळत असतात; मात्र दुधाबरोबर काही पदार्थांचे सेवन टाळणे हितावह ठरते, असे तज्ज्ञांनी म्हटलेले आहे. दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि फॉस्फरस यासारखे अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीरात हाडे मजबूत करण्यापासून ते अन्यही अनेक कारणांसाठी लाभदायक ठरतात. दुधाचे सेवन हे स्नायू मजबूत करण्यासाठी तसेच हृदयाशी संबंधित अनेक समस्याही कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. दुधामध्ये पेप्टाइड्स व मॅग्नेशियमही असते जे आरोग्याला हितकारक आहे.

Milk
Milk

विशेषतः स्नायू व हाडांच्या बळकटीसाठी ते उपयुक्त आहे. यासोबतच वृद्धावस्थेत ऑस्टियोपोरोसिस व फ्रॅक्चर होण्यापासून ते बचाव करते. मात्र, दुधासोबत काही पदार्थांचे सेवन करणे हानिकारक ठरते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही पदार्थ असे आहे जे दूध पिण्याआधी व नंतर खाऊ नयेत. दूध पिण्याआधी अतिशय खारट पदार्थ खाणे टाळावे. असे केल्याने पोटाला इजा होण्याची शक्यता असते. उडीद डाळ व आंबट पदार्थ खाल्ल्यानंतरही दूध पिणे टाळावे. दूध पिल्यानंतर मासे खाऊ नयेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये.

हेही वाचलंत का?

Back to top button