गटारीच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा शाळेला जाण्यासाठी जिवघेणा प्रवास; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार | पुढारी

गटारीच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा शाळेला जाण्यासाठी जिवघेणा प्रवास; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

सांगोला (सोलापूर), पुढारी वृत्‍तसेवा : सांगोला तालूक्‍यातील जूनोनी गावात प्राथमिक शाळेच्या समोरील रस्त्यावर गटारीतील पाणी अनेक दिवसापासून साचत आहे. परंतु ग्रांमपंचायतीकडून सांडपाण्याचे व्यवस्थापन केले जात नाही. यामूळे हे गटारीचे पाणी रस्‍त्‍यावर साचून राहत आहे. तर गटारातील दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच विद्यार्थी रोज शाळेला ये जा करत आहेत. विशेष म्हणजे अंगणवाडीच्या समोरच गटारितील पाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पालकांनी उपस्‍थित केला आहे.

दरम्‍यान, शाळेचा परिसर एवढा गलिच्छ असताना ते दिसत नसल्याचे सोंग गावातील ग्रामपंचायत करत आहे. तर याच प्राथमिक शाळेत शिकलेले अनेकजण आज आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत. मात्र याच पुढा-यांना या समस्येचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जुनोनी ग्रामपंचायतीने तातडीने शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदरच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणे करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास बाधा होणार नाही.

हेही वाचा

Back to top button