टेक्सास : ज्यावेळी उंचीबाबत चर्चा होते, त्यावेळी ताडाच्या झाडाची नेहमीच चर्चा होत असते. एखादा माणूस अतिउंच असेल तर त्याला ताडासारखा वाढलेला असेही म्हणतात. खरे तर उंचीबाबतची ही एक उपमाच आहे. मात्र, अमेरिकेतील एका तरुणीने ही उपमा खरी करून दाखविली, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
तिने आपल्या सर्वाधिक लांब पायांच्या बळावर चक्क विश्वविक्रमाची नोंद केली आहे. टेक्सास येथे राहणार्या 19 वर्षीय मॅस्सी क्यूरिनचे पाय फारच लांब आहेत. यामुळे सर्वात उंच पायांची म्हणून तिची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. तिची उंची एकूण उंची सहा फूट दहा इंच इतकी आहे. एखादे कोणीतरी मॅस्सीसमोर उभे राहिले तर कधी कधी त्या माणसाची उंची मॅस्सीच्या पायाइतकीच अथवा त्याहून कमी असल्याचे वाटते.
टिकटॉकवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या मॅस्सीची ताडासारखी उंची पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत असतो. उल्लेखनीय म्हणजे एखाद्याला फॉलोअर व्हावयाचे असेल तर मॅस्सीला 2600 रुपये द्यावे लागतात. आपल्या उंचीबाबत बोलताना मॅस्सीने सांगितले की, शरीराची एकूण उंची आणि पायाच्या उंचीबद्दल सोशल मीडियावर माहिती दे, असे मला कुटुंबीयांनी सांगितले. तेव्हापासून मी स्वत:कडे अत्यंत सकारात्मक द़ृष्टिकोनातून पाहते. याचा मला अत्यंत चांगला सकारात्मक लाभ मिळतो.