Bhool Bhulaiyaa 2 Teaser release : ‘भूलभुलय्या-2’चा टिझर | पुढारी

Bhool Bhulaiyaa 2 Teaser release : ‘भूलभुलय्या-2’चा टिझर

पुढारी ऑनलाईन :

अक्षय कुमार, विद्या बालन आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘भूलभुलय्या’ या चित्रपटाला मोठेच यश मिळाले होते. आता कार्तिक आर्यन ‘भूलभुलय्या-2’ घेऊन येत आहे. या चित्रपटाचा 53 सेकंदांचा एक टिझर आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये जुन्या चित्रपटातील ‘आमी जे तुम्हारो’ या गाण्याच्या पार्श्‍वभूमीवर एका भयावह हवेलीतील कुलूपबंद दरवाजा उघडत असताना दिसून येतो.

गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोक्याला रूमाल, कुर्ता परिधान केलेल्या कार्तिक आर्यनची एन्ट्री यानंतर दाखवण्यात आली आहे. जुन्या चित्रपटातील राजपाल यादवही यामध्ये दिसून येतो. या टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कार्तिकसमवेत कियारा अडवाणी, संजय मिश्रा आणि तब्बूची प्रमुख भूमिका आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button