सूर्यावर बनली खोल ‘व्हॅली ऑफ फायर’ | पुढारी

सूर्यावर बनली खोल ‘व्हॅली ऑफ फायर’

लंडन : सूर्य हा तारा अनेक रहस्यांनी भरलेला आहे. 3 एप्रिल 2022 रोजी तेथे प्लाझ्माच्या एका फिलोमेंटची निर्मिती झाली. हे फिलामेंट विशालकाय, अत्यंत खोल आणि शक्‍तिशाली होते. हे फिलामेंट आपल्या चुंबकीय शक्‍तीच्या बळावर सौरज्वाळा फेकत आहे. यामुळे पृथ्वीच्या ध्रुवावर सातत्याने अरोरा बनत आहे. हे फिलामेंट तब्बल 20 हजार कि.मी. खोल आणि 2 लाख कि.मी. लांब होते.

खगोल शास्त्रज्ञांनी या फिलामेंटला ‘व्हॅली ऑफ फायर’ असे नाव दिले आहे. इंग्लंडच्या हवामान विभागाने याची पुष्टी करताना म्हटले की, सूर्याच्या दक्षिण आणि मध्य भागात दोन मोठे फिलामेंट पाहण्यात आले. ज्याची छायाचित्रे अंतराळातील अल्ट्राव्हायोलेट भागात फिरणार्‍या सॅटेलाईटस् व जमिनीवर असलेल्या टेलिस्कोपनेही कॅमेराबद्ध केली आहेत.

खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले फिलामेंट 3 एप्रिल, तर दुसरे 4 एप्रिल 2022 रोजी बनले होते. सूर्यावर झालेल्या या स्फोटानंतर ‘कोरोनल मास इजेक्सन’ (सीएमई) झाले. त्यामुळे आवेशित प्लाझ्माच्या लहरी सूर्यापासून बाहेर पडून पृथ्वीपर्यंत पोहोचल्या. ज्यावेळी ‘सीएमई’ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडक देते, त्यावेळी जियोमॅग्‍नेटिक वादळाची निर्मिती होते. जर हे वादळ शक्‍तिशाली असेल, तर सॅटेलाईटस् लिंक बाधित करू शकते. यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेली यंत्रे आणि इलेक्टॉनिक्स उपकरणांमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे, जियोमॅग्‍नेटिक वादळामुळेच नॉदर्न लाईटस्ची निर्मिती होते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button