Volcano : प्राचीन बर्फाने उलगडला ज्वालामुखीचा इतिहास | पुढारी

Volcano : प्राचीन बर्फाने उलगडला ज्वालामुखीचा इतिहास

लंडन : अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड या ध्रुवीय भागांतील प्राचीन बर्फापासून ज्वालामुखीबद्दलची ऐतिहासिक माहिती मिळविण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, हिमयुगादरम्यान विशालकाय आणि भीषण ज्वालामुखींचा उद्रेक झाला होता. याबद्दलची सखोल माहिती कोणालाच माहीत नव्हती; मात्र आता याचे गूढ आता उलगडण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळविले आहे.

संशोधकांच्या मते, मानवाला अद्याप माहीत नसलेल्या अशा 69 ज्वालामुखींचा उद्रेक झाला होता की, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. कोपनहेगन युनिव्हर्सिटीच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेले हे संशोधन ‘क्‍लाईमेट ऑफ द पास्ट’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हे ज्वालामुखी जल-वायू परिवर्तनाबद्दलचा धडा देऊ शकतात. कोपनहेगन युनिव्हर्सिटीचे नील बोर इन्स्टिट्यूटचे असो. प्रोफेसर एडर्स स्वेनसोन यांनी सांगितले की, आम्ही प्राचीन काळी झालेल्या भीषण ज्वालामुखींना पाहिलेले नाही. मात्र, त्याबद्दलची माहिती मिळवू शकतो. 2010 मध्ये ‘इजेफयालियाकूल’ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामुळे युरोप खंडातील दळवळण ठप्प झाले होते. शोधण्यात आलेल्या प्राचीन काळातील ज्वालामुखीसमोर ‘इजेफयालियाकूल’चा उद्रेक काहीच नाही. हिमयुगात झालेले ज्वालामुखींचे उद्रेक हे गेल्या अडीच हजार वर्षांतील सर्वात मोठे होते.

संशोधकांनी अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडमधील बर्फात खोलवर खोदाई करून गेल्या 60 हजार वर्षांत झालेल्या ज्वालामुखींची संख्या आणि त्यांच्या तीव्रतेबद्दलची माहिती गोळा केली आहे. यामध्ये शेकडो ज्वालामुखींपैकी 85 ज्वालामुखी विनाशकारी होते. यापैकी एक 1815 मध्ये इंडोनेशियातील माऊंट तंबोरा भागात झाला होता.

संबंधित बातम्या

हेही वाचलत का ?

Back to top button