नवी दिल्ली : 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात '100 कोटींच्या क्लब'मध्ये स्थान मिळविले. आतापर्यंत चित्रपटाने 141.25 कोटींचा व्यवसाय केल्याचे समजते. दिवसेंदिवस या चित्रपटाची लोकप्रियता वाढतच आहे. या यशामुळेच आता हा चित्रपट प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'द कश्मीर फाईल्स' हा आता चार प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत लवकरच हा चित्रपट डब करण्यात येणार असल्याचे समजते. या चित्रपटात 1990 मध्ये काश्मीर खोर्यात हिंदूंवर झालेला अन्याय दाखविण्यात आला आहे.