वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो मोबाईल?

वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो मोबाईल?
Published on: 
Updated on: 

लंडन : सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने थक्क करणारी प्रगती करून दाखवली आहे. सध्या आपण पाहत असलेली अनेक उपकरणे अशी आहेत ज्यांच्याबाबत काही वर्षांपूर्वी आपल्याला कल्पनाही करता आली नसती. मोबाईल फोनने तर आता जग बदलले आहे. शिवाय त्याला चार्ज करणारे चार्जरही आता अद्ययावत बनलेले आहेत. केबल्सचा त्रास वाचवण्यासाठी आता वायरलेस चार्जरही निघाले आहेत. थेट हवेतूनच त्यांच्या सहाय्याने मोबाईल कसा चार्ज होतो याबाबत आपल्याला निश्चितच कुतुहल वाटू शकते.

सध्या अशा वायरलेस चार्जिंगचा ट्रेंड वाढत आहे. यूजर प्रिमियम फोनसह वायरलेस चार्जिंगचा वापर करीत आहेत. मात्र, अनेक यूजर्सना असे वाटते की याचा डिव्हाईसवर वाईट परिणामही होऊ शकतो. त्यामुळे हे वायरलेस चार्जिंगचे तंत्रज्ञान कसे कार्य करते व त्याचा डिव्हाईसवर वाईट परिणाम होतो की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठी सर्वात प्रथम वायरलेस चार्जिंग कसे काम करते हे जाणून घेऊया.

'गॅझेटस् नाऊ'च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की वायरलेस चार्जिंगमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याला 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन' असे म्हणतात. असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन निर्माण करणारे उपकरण हवेत इलेक्ट्रिक लहरी सोडते व त्यामुळे फोन चार्ज होतो. मात्र, या प्रकारच्या चार्जिंगसाठी तुमचा फोन वायरलेस चार्जिंगला 'सपोर्ट' करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, वायरलेस चार्जिंग अतिशय लाभदायक आहे, परंतु ते वायर चार्जरपेक्षा कमी प्रभावी आहे.

त्याला काम करण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. एका संशोधनानुसार वायरलेस चार्जिंग हे वायर चार्जरपेक्षा 47 टक्के अधिक ऊर्जा वापरते. वायरलेस चार्जिंगवेळी फोन तुलनेने अधिक गरम होतो. काही फोन ही उष्णता सहन करू शकतात; पण काही फोन ही उष्णता सहन करण्यास सक्षम नसतात.

त्यामुळे यूजरने याची काळजी घेतली नाही तर फोन खराब होऊ शकतो. वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार्‍या स्मार्टफोनमध्ये कॉपर कॉईल्स असतात. वायरलेस चार्जरमध्ये वापरण्यात येणारे इलेक्ट्रोमॅग्नेेटिक इंडक्शन चालू असताना ते स्वतःभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. ते स्मार्टफोनच्या कॉपर कॉईल्सला जोडले जाते. या चुंबकीय क्षेत्रातून विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि फोनची बॅटरी चार्ज होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news