

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. कौटुंबिक कारणांमुळे त्याने संघात न येण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरू लागल्या. कधी पत्नी अनुष्का शर्मा दुस-यांदा आई होणार असल्याचं बोललं जात होतं तर कधी कोहलीच्या आईची तब्येत बिघडल्याचं समोर आलं होतं. आता विराटचा मोठा भाऊ विकास याने सर्व काही स्पष्ट केले आहे. (Virat Kohli Mother Health)
संबंधित बातम्या :
विकास कोहलीने इन्स्टाग्रामवर आई सरोज कोहलीच्या प्रकृतीशी संबंधित अफवा फेटाळून लावल्या. त्याने चाहत्यांना योग्य माहितीशिवाय खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन केले. आईच्या आजारपणामुळे विराटने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती मागितल्याच्या अफवा पसरल्या होत्या. (Virat Kohli Mother Health)
विकासने इंस्टाग्रामवर लिहिले की, "आमच्या आईच्या तब्येतीची ही खोटी बातमी सर्वत्र पसरलेली मी पाहिली आहे. मी स्पष्ट करतो की आमची आई पूर्णपणे तंदुरुस्त आहे. योग्य माहितीशिवाय अशा बातम्या पसरवू नयेत अशी मी सर्वांना आणि प्रसारमाध्यमांना विनंती करतो.
हेही वाचा :