Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे वादळी शतक

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे वादळी शतक
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना स्मृती मानधनाने मंगळवारी वादळी शतक झळकावले. 'बीसीसीआय'च्या वरिष्ठ आंतरविभागीय महिला वन-डे स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व सांभाळताना स्मृतीने कॅप्टन्स इनिंग खेळली. तिच्या शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने 7 विकेटस् व 49 चेंडू राखून पूर्व विभाग संघाचा सहज पराभव केला. पश्चिम विभागाच्या विजयात ओपनर यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही हातभार लावला. (Smriti Mandhana)

पूर्व विभागाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 264 धावा उभ्या केल्या. कर्णधार दीप्तीने 137 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. उमा चेत्रीने 49 चेंडूंत 54 धावा केल्या, तर सुश्री दिव्यादर्शनी (31) व जिंतिमणी कलिता (26) यांनी धावसंख्येत योगदान दिले. पश्चिम विभागाच्या ए. पाटीलने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या आणि पूर्व विभागाच्या मधल्या फळीला हतबल केले. सायली सातघरेने दोन, तर एस. पोखरकर व पी. नाईक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Smriti Mandhana)

लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. यास्तिका 45 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 42 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमासह दुसर्‍या विकेटसाठी स्मृतीने 154 धावा जोडल्या. स्मृती 118 चेंडूंत 136 धावांवर बाद झाली. तिने 15 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 20 चेंडूंत 90 धावा कुटल्या. जेमिमाच्या खेळीला 72 धावांवर (79 चेंडू) ब्रेक लागला. तोपर्यंत पूर्व विभागाच्या हातून सामना निसटला होता. पश्चिम विभागाने 41.5 षटकांत 3 बाद 265 धावा करून बाजी मारली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news