

हापुड : ऐन थंडीच्या दिवसांत आईने आंघोळ करायला सांगितल्याने नाराज झालेल्या एका ९ वर्षीय मुलाने थेट पोलिसांना घरी बोलावल्याची गंमतीशीर घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) हापुड जिल्ह्यात समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, (Uttar Pradesh News) एका गावातून ११२ क्रमांकावर कॉल आल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन सगळा प्रकार समजल्यानंतर त्यांनाही हसू आवरता आले नाही. आईने आंघोळ करायला लावल्याने चिडलेल्या मुलाने हा उद्योग केला. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली असता, माझे आई-वडील माझ्या आवडीप्रमाणे केसही कापू देत नाहीत, अशी तक्रारही त्याने केली. अखेर पोलिसांनी त्याची समजूत घातल्यानंतर तो आंघोळीला गेला. त्यानंतर या गंमतीशीर प्रकरणावर पडदा पडला.
हेही वाचा :