पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉर्जियामधील (अमेरिका) एका हाऊस पार्टीमध्ये शनिवारी (दि.६) झालेल्या बेछूट गोळीबारात दोन मुले ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. या पार्टीत १०० पेक्षा जास्त किशोरवयीन मुल-मुली सहभागी झाले होते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार हा गोळीबार हाऊस पार्टीमध्ये झालेल्या भांडणातून झाला. वाचा सविस्तर बातमी. (US News)