Urmila Kothare : महेश कोठारेंच्या सुनेचं ब्लॅक सूटमध्ये ?हॉट फोटोशूट

Urmila Kanetakar
Urmila Kanetakar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना उर्मिला कानिटकर (Urmila Kothare) म्हणजेच कोठारेंची सून उर्मिला कोठारेचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. उर्मिलाने काळ्या रंगाच्या थ्री पीस सूटमध्ये फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, उर्मिला या आऊफिटमध्ये इतकी सुंदर दिसतेय. तिने एका व्हिडिओसह फोटोशूट अनेक फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोंना तिने कॅप्शन दिलीय की- .. a little lost, a little found ? तर आणखी एका व्हिडिओला तिने ???फायर इमोजी शेअर केल्या आहेत. (Urmila Kothare)

उर्मिलाने स्पोर्टर्स ब्रा टाईप अप्पर, काळी पॅट आणि त्यावर जॅकेट असा लूक केला आहे. मोकळ्या कुरळ्या केसात आणि लाईट मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.

उर्मिलाला पाहन नेटकरी काय म्हणतात?

Super duper cool ?????????❤️❤️❤️ एकदम घायाळ करणारी अदा आहे तुझी ❤️, ??????❣️??, Gorgeous diva, ?????????????????????????, ????hot looking urmila ??, Sexyyy ???, खुप सुंदर?, Gorgeous stunning personality Beautiful stunning presentation of outfit, Wow this is totally hot ????, Black ??? beauty, Khup sundar ❤️❤️, Super Gorgeous ????❤️❤️ अशा कमेंट करत तिच्या चाहत्यांनी उर्मिलाच्या सौंदर्याचं कौतुक केलंय.

उर्मिला फिटनेस फ्रिकदेखील आहे. ती रोज योगासनेदेखील करते. योग करतानाचे तिचे व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतात. वेस्टर्न लूक असो वा पारंपरिक भारतीय पोषाख सर्व आऊटफिट्समध्ये उर्मिला खूप सुंदर दिसते. ती नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतही दिसली होती.

उर्मिला कानेटकर कोठारे एक मराठी चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री आहे. दुनियादारीतील भूमिकेसाठी उर्मिलाला ओळखलं जातं. 'शुभ मंगल सावधान,' 'ती सध्या काय करते' तसेच हिंदी टीव्ही मालिका 'मायका' आणि 'मेरा ससुराल' त्याचसोबत मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची'मध्ये तिने अभिनय केला आहे. ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने २०१४ मध्ये वेलकम ओबामामधून तिने तेलुगु सिनेमातही काम केले आहे. यामध्ये तिने 'यशोदा' नावाची भूमिका साकारली होती.

उर्मिलाचा जन्म ४ मे, १९८६ रोजी पुण्यात झाला होता. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मास्टर ऑफ आर्ट्समध्ये पदवी घेतलीय. तिने ओडिसीसाठी भुवनेश्वर येथे सुजाता महापात्रा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. 'शुभ मंगल सावधान' तिचा पहिला चित्रपट होता. 'आई शपथ' आणि 'सावली' या चित्रपटांमध्येही ती झळकली. यामध्ये तिने दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांच्यासोबत काम केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news