Latest
१.३९ लाख कोटी रुपये खर्चाच्या ब्रॉडबॅंड योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : देशाच्या काना-कोपऱ्यातील गावांपर्यंत ब्रॉडबॅंड संपर्काचे जाळे पोहोचविण्यासाठी 1.39 लाख कोटी रुपये खर्चाच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत नेट प्रकल्पाअंतर्गत ब्रॉडबॅंड संपर्काची ही योजना राबविली जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर योजनेमुळे देशातील प्रत्येक गावापर्यंत ब्रॉडबॅंड जाळे पोहोचेल. सध्या देशातील 1.94 लाख गावे ब्रॉडबॅंड जाळ्याने जोडली गेली आहेत. उर्वरित गावांत पुढील अडीच वर्षांच्या काळात हे जाळे पोहोचेल. आॅपि्टकल फायबर आधारित या योजनेसाठी 1 लाख 39 हजार 579 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. बीएसएनएलच्या अखत्यारितील भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड (Bharat Broadband Network Limited) कंपनीकडून ही योजना राबविली जाणार असल्याचे समजते.
.हेही वाचा

