‘प्रोबायोटिक फूड’ आरोग्यासाठी का आहे लाभदायक? जाणून घ्या अधिक

‘प्रोबायोटिक फूड’ आरोग्यासाठी का आहे लाभदायक? जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 'प्रोबायोटिक्स' हे वयोमानानुसार स्मरणशक्ती तसेच विचारक्षमता कमजोर होण्यास रोखतात. 'प्रोबायोटिक' आहार घेतल्याने अल्झायमर व डिमेन्शियासारख्या मेंदूच्या विस्मरणाशी संबंधित दुर्धर आजारांचा परिणाम कमी केला जाऊ शकतो. आरोग्याला हितकारक अशा जीवाणूंना 'प्रोबायोटिक्स' असे म्हटले जाते.

जीवाणू हे दोन प्रकारचे असतात. काही जीवाणू मनुष्यासाठी लाभदायक आणि अत्यावश्यक असतात तर काही जीवाणू आरोग्यासाठी धोकादायक असतात जे विविध रोग निर्माण करतात. आपल्या पोटातील जीवाणू हे पचनसंस्थेचाच एक भाग बनलेले असतात. अशा चांगल्या जीवाणूंची शरीराला आवश्यकता असते. हे जीवाणू आपली श्वसनसंस्था तसेच पचनसंस्था यांच्यामध्ये 'चेक अँड बॅलन्स'चे काम करतात. जर आपण आजारपणामुळे अँटिबायोटिक गोळ्या अधिक खाल्ल्या असतील तर त्यांच्यापासून होणारी हानी कमी करण्यासाठी असे 'प्रोबायोटिक्स' उपयोगी पडतात. अशा प्रोबायोटिक्सना अन्न तसेच न्यूट्रिशनल सप्लिमेंटस्च्या माध्यमातूनही घेता येते. प्रोबायोटिक्स आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतात, इतकेच नव्हे तर मेंदूच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरतात असे आता आढळले आहे.

या संशोधनासाठी 52 ते 75 वर्षे वयोगटातील 169 लोकांना तीन महिने प्रोबायोटिक लॅक्टोबॅसिलस रमनोसस जीजी (एलजीजी) ट्रिटमेंट देण्यात आली. त्यांच्यामुळे या लोकांमध्ये 'कॉग्नेटिव्ह इम्पेयर्मेंट'ची लक्षणे कमी झाल्याचे आढळून आले. अशा 'कॉग्नेटिव्ह इम्पेयर्मेंट'मध्ये लोक अनेक गोष्टी विसरू लागतात व त्यांची एकाग्रताही कमी होते. संशोधनात आढळले की कॉग्नेटिव्ह इम्पेयर्मेंटची लक्षणे कमी होण्याचा परिणाम 'गट मायक्रोबायोम' म्हणजेच पोटातील जीवाणूंवरही झाला. हे पोटातील जीवाणू शरीरामधील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, जीवनसत्त्वे व हार्मोन्सची निर्मिती करणे, कोलेस्टेरॉल संतुलित ठेवणे, कॅलरीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी मदत करतात.

बाह्य रोगजंतूंशी लढण्यासाठी तसेच आपल्या चेतासंस्थेचे काम सुरळीत ठेवण्यासाठीही त्यांची मदत होते. 'प्रोबायोटिक फूड' हे असे अन्न असते ज्यामध्ये जिवंत जीवाणू असतात. ते यीस्टयुक्त, आंबवलेल्या पदार्थांमध्ये आढळतात. इडली, डोसा, आप्पे, दही, ढोकळा, लोणचे यामध्ये तसेच भात, पत्ताकोबी, फ्लॉवर, सोयाबिन, दूध यामध्येही असे उपयुक्त जीवाणू असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news