केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा; चिंचवड शहर वाहतुकीत बदल | पुढारी

केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा; चिंचवड शहर वाहतुकीत बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकार खात्याच्या कार्यक्रमासाठी चिंचवडमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 6) चिंचवडमधील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार्‍या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव काही मार्ग बंद केले असून, या मार्गावरून जाणार्‍या वाहनांना पर्यायी रस्ता सूचविण्यात आला आहे.

असे असतील बदल
महावीर चौक – महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरची वाहने ही महावीर चौककडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील. दर्शन हॉल लिंक रोड, लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश – बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरचे वाहने ही मोरया हॉस्पिटल चौककडून इच्छित स्थळी जातील.

सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत बदल
रिव्हर व्ह्यूव चौक- रिव्हर व्ह्यूव चौकाकडून चापेकर चौक, अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी रस्ता सदरची वाहने रिव्हर व्ह्यूव चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
वरील वाहतूक बदल हे रविवारी (दि. 6) सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील व कार्यक्रमासाठी येणारी निमंत्रितांची वाहने वगळून) सर्व प्रकारचे वाहने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

पिंपरी-चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ वाढली

पिंपरी : वेस्ट टू एनर्जी लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार

Back to top button