

पुढारी ऑनलाईन डेस्क : "गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो." असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केेल आहे. (Union Budget 2023 )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी रोजी सादर केला. त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पासंबधी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी ट्विट करत या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो असं म्हंटलं आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्विट केले आहे की, "निर्मला सीतारामणजी यांनी बुधवारी (दि.१) संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'सबका साथ,सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळाला आहे.
देशाला आणि राज्याला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱा आहे. राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा आणि खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा, उद्योगांना उभारी देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून सहकार क्षेत्राला खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे. शहरी आणि ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. तसेच सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना धन्यवाद देत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.