Chandrakant Patil News : डबल इंजिनचं सरकार विरोधकांना धडकी भरवणार! - चंद्रकांत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : काल (दि.२०, शुक्रवार) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. (MPSC) एकूण ८ हजार १६९ पदांसाठी ही जाहिरीत काढली आहे. ट्विटरवरदेखील आयोगाने यासंदर्भात अपडेट दिली आहे. या संदर्भाने राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Chandrakant Patil News )
“डबल इंजिनचं सरकार विरोधकांना धडकी भरवणार! महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC नं तब्बल 8 हजार 169 जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करा!” असं लिहीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच धन्यवाद मानलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीरातीचा फोटोही शेअर केला आहे. आता विरोधकांची काय प्रतिक्रिया असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Chandrakant Patil News : किती जागांसाठी आहे भरती
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. ही जाहीरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची ७० पदे भरली जाणार आहेत. ट्विटरवर देखील यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. (MPSC)
या जाहिरातीमधील महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क साठी संयुक्त परीक्षा राज्यातील 37 जिल्ह्यात केंद्रांमवर 30 एप्रिल 2023 रोजी होईल. तर अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी आणि क गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
डबल इंजिनचं सरकार
विरोधकांना धडकी भरवणार!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात #MPSC नं तब्बल 8 हजार 169 जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे.
आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे.
विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करा!
धन्यवाद, @mieknathshinde जी, @Dev_Fadnavisजी! pic.twitter.com/KZjHujgKX4— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 21, 2023
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/MCMN6Peqpt
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक ७.४ मध्ये सहायक कक्ष अधिकारी पदाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू असल्याचे अनावधानाने नमूद झाले आहे. सदर संवर्गासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी लागू नाही
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
हेही वाचा
- Kirit Somaiya News : किरीट सोमय्या आक्रमक; संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर आरोप करत अटकेची मागणी
- पुणे : जी-20 मधून भविष्य घडविण्याची संधी : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
- मनपासह सर्व निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढणार : चंद्रकांत पाटील