सोलापुरात ८ लाखाची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त

सोलापुरात ८ लाखाची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने आज (रविवार) पहाटे 3.30 वाजता सोलापूर शहरातील गेंट्याल टॉकीज चौक येथे सापळा रचून एका टेंपोतून गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याचा एकूण रुपये 8 लाख 40 हजार 960 किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला आज पहाटे ३.३० वाजता सोलापूर शहरातील गेंट्याल चौक येथे एका टाटा 407 टेंपोतून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या खात्रीलायक बातमीवरून या पथकाने सापळा रचला. त्यानुसार टेंपो क्रमांक MH 04 EB 6050 या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता, शिवा बाबू राठोड, राहणार विजापूर व इरेश गंगाधर नावडे, राहणार, भवानी पेठ सोलापूर हे दोघे आढळून आले.

त्यांना सदर वाहनात काय आहे? अशी विचारपूस केली असता, त्यात विदेशी दारू असल्याचे त्यांनी सांगितले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे पाच ब्रँडचा साठा मिळून आला. सदर साठ्यामध्ये रॉयल स्टॅग विस्की, ओल्ड बिल व्हिस्की, इम्पेरियल बल्यू व्हिस्की, मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की , रॉयल चॅलेंज व्हिस्की या ब्रँडचे एकूण 110 बॉक्स आढळून आले. जप्त केलेल्या दारू ची किंमत आठ लाख ४० हजार ९६० रुपये इतकी असून वाहनाच्या किंमतीसह एकूण १४ लाख ४० हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर माळी, राहणार मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर एस. ए. पाटील, सुरेश झगडे, दुय्यम निरीक्षक श्रीमती मिसाळ व सहायक दुय्यम निरीक्षक होळकर, जवान कर्मचारी सावंत, ढब्बे, चेतन व्हनगुंटी, वाहन चालक दिपक वाघमारे व मदने यांनी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून, अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news