मुळेगाव तांड्यावर हातभट्टीचे रसायन नष्ट

मुळेगाव तांड्यावर हातभट्टीचे रसायन नष्ट
मुळेगाव तांड्यावर हातभट्टीचे रसायन नष्ट
Published on
Updated on

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिसांकडून मुळेगाव तांड्यावर दोन ठिकाणी छापे टाकून 2800 लिटर हातभट्टीला लागणारे गुळमिश्रीत रसायन नष्ट करण्यात आले असून, याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस शिपाई किशोर सलगर यांच्या फिर्यादीवरुन हरणमंत भीमा राठोड (वय 30, रा. मुळेगाव तांडा) याच्याविरुध्द आणि पोलिस शिपाई संजय नेमाजी यांच्या फिर्यादीवरुन विलास थावरू जाधव (वय 35, रा. मुळेगाव तांडा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुळेगाव तांड्याच्या उत्तरेस असलेल्या सालकी वेअर हाऊसच्या पूर्व भिंतीजवळील हातभट्टीवर छापा मारला. त्यावेळी हणमंत राठोड हा हातभट्टी तयार करण्यासाठीचे रसायनपासून हातभट्टी तयार करताना मिळून आला.

दुसर्‍या कारवाईत पोलिसांनी मुळेगाव तांडा ते बक्षि हिप्परगा जाणार्‍या रोडच्या कडेला विलास जाधव हा हातभट्टी तयार करण्याचा अड्डा चालवित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या कारवाई 42 हजार रुपये किंमतीचे 2000 लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट केले. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस नाईक शेख व सय्यद पुढील तपास करीत आहेत. यशाला छेद..? सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या व यशस्वी झालेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' ला छेद देण्याचा प्रयत्न सातपुते यांनी दत्तक घेतलेल्या मुळेगाव तांड्यातून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news