मंगळवेढ्यात भरदिवसा 1 लाख 48 हजार रुपयांची चोरी

मंगळवेढ्यात भरदिवसा 1 लाख 48 हजार रुपयांची चोरी
Published on
Updated on

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा शहरालगत असलेल्या रामकृष्ण नगर येथे भरदिवसा चोरट्यांनी घराची कडी कोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याने दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी कुसूम सुभाष मोरे या रामकृष्ण नगरमध्ये रहात आहेत. दि.16 रोजी सकाळी 10 वा. त्या नातवंडांना प्रायमा शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती सुभाष हे घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेले होते.

फिर्यादी ह्या मुलांना शाळेत सोडून 11 वा. घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. तद्नंतर त्यांनी मुलगा नितीन यास फोन करून घटनेची हकिकत सांगितली. फिर्यादी व त्यांचा मुलगा, सून यांनी घरात जावून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडलेले दिसले. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरटयांनी कपाटात ठेवलेले 80 हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट,20 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे कानातील झुबे,

20 हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाची पिळयाची अंगठी,10 हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाच्या दोन लेडीज अंगठ्या,12 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे कानातील फुले,5 हजार रुपये किमतीची चांदीची वाटी, करंडे, पैंजण, ब्रासलेट व रोख एक हजार रुपये, असा एकूण 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news