चाकणकर यांच्यावरील बदनामीकारक पोस्ट तरुणावर गुन्हा दाखल

चाकणकर यांच्यावरील बदनामीकारक पोस्ट तरुणावर गुन्हा दाखल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची बदनामी होईल, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यायाबद्दल बार्शी येथील युवराज चंद्रकांत ढगे (वय 35, रा. प्रसन्‍नदाता मार्ग, बार्शी) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सुवर्णा किशोर शिवपुरे (वय 48, रा. पाटील चाळ, तुळजापूर रोड, बार्शी) या महिलेने फिर्याद दिली.

याबाबत माहिती अशी की, 14 जून रोजी वटपौर्णिमेबद्दल आपली परंपरा सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यावर ढगे याने अश्‍लील कमेंटस् करत त्यांची बदनामी होईल, असे शब्द वापरले होते. याविरोधात सुवर्णा शिवपुरे यांनी बार्शी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार युवराज ढगे याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज ढगे याला याप्रकरणी अटक करून नोटीस देऊन सोडून देण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news