गोवा : मोप विमानतळ परिसरात अग्नितांडव; सहा ट्रक खाक, लाखोंचे नुकसान

गोवा : मोप विमानतळ परिसरात अग्नितांडव; सहा ट्रक खाक, लाखोंचे नुकसान
Published on
Updated on

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी, 23 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. विमानतळाच्या बांधकामासाठी या ट्रकचा वापर सुरू होता. काही ट्रक एका बाजूला उभे करण्यात आले होते. त्यातील एका ट्रकला आग लागली. ही घटना समजण्यापूर्वी बाजूला असणार्‍या पाच ट्रक्सनी पेट घेतला. त्यामुळे इतर ट्रक हलविता आले नाहीत. या ट्रकपासून काही अंतरावर असलेली जेसीबी व अन्य यंत्रे हलविण्यास यश आले.

यावेळी परिसरात आगीच्या मोठा ज्वाला वणवा तसेच सगळीकडे पसरल्यामुळे धुराचे मोठे लोळ उठले होते. परंतु नक्की काय झाले हे कुणालाच कळत नव्हते. कारण विमानतळाच्या परिसरात जायला कुणालाही परवानगी नव्हती. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनाही आत प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे नक्की किती नुकसान झाले आणि कशी आग लागली याची माहिती मिळविताना खूप अडचणी निर्माण झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचा मोठा प्रयास केला. त्यामुळे बरीच मालमत्ता अग्निशमन दलाने वाचविली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी ट्रकमध्ये शॉर्टसर्किट होऊन किंवा या ट्रक जवळून गेलेल्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागल्याने कामगारांमध्येही गोंधळ उडाला.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवत असताना म्हापसा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र, कडक उन्हामुळे आग आटोक्यात आणताना अडचणी निर्माण होत होत्या. तरीही शिकस्त करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news