बिडकीन; पुढारी वृत्तसेवा : माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून दे, असा तगादा लावणाऱ्या महिलेला कंटाळून पैठण येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेश सुभाष मुसळे ( वय ३०, रा. लोहगाव ता.पैठण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यांपासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणत तरूणाकडे काही दिवसांपासून तगादा लावला होता.या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून शनिवारी सकाळी गणेश मुसळे याने (शनिवार) सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केली.
गणेशच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेविरोधात बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि महेश जाधव करीत आहेत.
हेही वाचा :