औरंगाबाद : साहेब, तुमच्या तालुक्यात एखादे स्थळ बघा! तरुणाची थेट आमदारांकडेच मागणी

File Photo
File Photo

कन्नड(औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : आमदार साहेब, मी खुलताबाद तालुक्यातील ग्रामीणमधून बोलतोय. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आठ-नऊ एकर जमीन आहे. तरीही इकडे मुली देत नाहीत. तुमच्या तालुक्यात खूप मुली आहे, एखादे स्थळ बघा, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याकडे एका तरूणाने फाेनवरून केली. यामुळे 'शेतकरी नवरा नको ग बाई' हा विषय पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण भागात चांगली शेती असूनही, शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. मुलींना शहरात खासगी कंपनीत किंवा सरकारी नोकरी असणारा जोडीदार हवा असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना वधू शोधताना दमछाक होत आहे.

आमदार राजपूत यांना तालुक्यातुन आमच्या गावात रस्ते करा, पाण्याची सोय करा, डीपी दया, आदी विविध कामासाठी कार्यकर्ते तसेच नागरिकांचे फोन येत असतात. मात्र दुसऱ्या तालुक्यातील तरुणाने थेट फोनवर "तुमच्या तालुक्यात खूप मुली आहेत. साहेब, एखादे स्थळ बघा, अशी मागणी केली. आमदार राजपूत यांनी तुझा बायोडाटा पाठवून दे बघतो म्हणून तरुणाचे समाधान केले. याबाबतची माहिती आमदार राजपूत यांनी माध्यमांना दिली. या अजब मागणीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news