पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

पारगाव ; पुढारी वृत्तसेवा 

घराशेजारी गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना वळती (ता. आंबेगाव ) येथील काटवान वस्तीत आज (रविवार) सकाळी ९ वाजता घडली. यामध्ये ही महिला जखमी झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वळती गावाच्या पूर्व दिशेला काटवानवस्ती आहे. तेथे कैलास बबन हिंगे हे शेतकरी राहतात. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी वंदना कैलास हिंगे (वय ४५) या घराच्या पश्चिम दिशेला असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्‍या. त्यावेळी पाठीमागे आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्‍ल्‍या मध्ये वंदना हिंगे यांच्या कंबरेत बिबट्याचे दोन दात घुसले आहेत. यावेळी वंदना यांनी मोठ्याने आरडाओरडा केला, यामुळे बिबट्याने त्यांना सोडून पळ काढला. त्यानंतर त्या घराकडे पळत आल्या. त्यांनी घटनेची माहिती पती कैलास हिंगे यांना दिली. वंदना हिंगे यांना उपचारासाठी मंचर येथिल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news