जळगाव : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Published on
Updated on

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथील विवाहितीने घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शिमा मंगलसिंग सूर्यवंशी (वय ३८, रा. तिरपोळे, ता. चाळीसगाव) असे त्‍यांचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही.  

वाचा : जळगाव : शिक्षकाच्या घरात २ लाखांची चोरी

याबाबत अधिक माहिती अशी की, तिरपोळे येथील शिमा सूर्यवंशी (वय ३८, रा. तिरपोळे, ता. चाळीसगाव) यांनी घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

वाचा : जळगाव : पतीला ठार मारण्‍याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा

सुनेरसिंग रूपसिंग सूर्यवंशी (रा. तिरपोळे) यांच्या फिर्यादीवरून मेहूनबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार सपोनि सुभाष पाटील तपास करीत आहेत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news