चिपळून : शेखर निकम यांची विजयी आघाडी

Published on
Updated on

कोकण (चिपळून) : पुढारी ऑनलाईन डेक्स 

राज्यातील एक एक मतदार संघातील मतमोजणीचे निकाल हाती येत आहेत. हे निकाल कोणाला खुशी कोणाला गम देणारे आहेत. एकीकडे राज्यात युतीचे सरकार येईल असे चित्र  असताना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपले पहिले खाते चिपळूनमध्ये उघडले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार शेखर निकम यांनी १ लाख ९९५ मते मिळवत विजयी आघाडी घेतली आहे. त्यांचे सेनेचे प्रतिस्पर्धी सदानंद चव्हाण यांना ७१ हजार मते मिळाली आहेत. 

शेखर निकम यांनी घेतलेली ही आघाडी म्हणजे त्यांचा विजय मानला जात आहे. चिपळून मतदार संघात निकम यांच्या प्रचारात पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने किंवा पक्षाने कोणतीही सभा घेतलेली नाही. तर या मतदार संघात फक्त शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातुन खासदार डॉ. आमोल कोल्हे यांनी हजेरी लावत मतदारांना विकासासाठी आघाडी सरकारच्या उमेदवाराला निवडूण देण्याचे आवाहण केले होते. महत्वाची बाब म्हणजे शेखर निकम यांनी पहिल्या फेरी पासुन २५ व्या फेरी पर्यंत मताधिक्य घेतले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news