बैजू पाटील यांच्या ’गजराज डस्ट बाथ’ला जागतिक फोटाग्राफीचे दुसरे पारितोषिक

गजराजाचा डस्ट बाथ
गजराजाचा डस्ट बाथ
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांनी जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेल्या गजराजाच्या डस्टबाथ फोटोला जागतिक दर्जाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जागतिक स्तरावरील क्रोमॅटिक-२०२२ पोलंड सेंट्रल युरोप यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते. या स्पर्धेतील एक लाखांपेक्षा अधिक फोटोमधून बैजू पाटील यांच्या फोटोला दुसरा क्रमांक मिळाला.

जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये हत्ती स्वतःच्या अंगावर माती टाकत असल्यानाचा क्षण बैजू पाटील यांनी कॅमेऱ्यात टिपला होता. हत्तीच्या शरीरावर बसणाऱ्या जीवजंतूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळी पाण्यात अंघोळ झाल्यानंतर हत्ती ठराविक वेळेला शरीरावर मातीची उधळण करत असतात. हा क्षण टिपण्यासाठी त्यांना सतत आठ दिवस त्या भागात जावे लागले. हा क्षण टिपताना समोरून दोन कोल्हेही जात होते. यातील एका कोल्ह्याने त्याच्या तोंडात शिकार पकडलेली दिसते.

हा फोटो गोल्डन अवर्समध्ये काढल्यामुळे सूर्याची सोनेरी किरणे बॅकग्राऊंडला दिसत आहेत. पहाटेची किरणे आणि कोल्ह्यांचा अंडरएक्स्पोज फोटो, यामुळे या फोटोला कलात्मकता आली आहे. जगभरात या फोटोला नावाजले जात असून सर्वत्र कौतुक होत आहे, जागतिक स्तरावरील हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी लवकरच परदेशात जाणार असल्याचे बैजू पाटील म्हणाले.

.हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news