पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तात्पुरता पुढे ढकलला, नवीन तारखा लवकरच | पुढारी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तात्पुरता पुढे ढकलला, नवीन तारखा लवकरच

पुढारी ऑनलाईन: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) काही अपरिहार्य कारणास्तव तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेगेवेगळ्या चित्रपटांची पर्वणी असते. जगातील अनेक नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शक या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. भाषेनुसार महोत्सवातील चित्रपटांची विभागणी केली जाते. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसोबतच काही विदेशी भाषेतील चित्रपटदेखील असतात. हे विविध चित्रपट पाहण्यासाठी आणि त्याचं समीक्षण करण्यासाठी प्रत्येक वर्षी चित्रपटप्रेमी आणि चित्रपटाचा अभ्यास करणारे विद्यार्थी हजेरी लावतात.

गेल्या वर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला होता. तर कोरोना काळामध्ये हा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडला होता. यंदाही या महोत्सवाची जोमात तयारी होती. मात्र, आता काही कारणामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे.

Back to top button