सोलापूरच्या महिलेचा विधान भवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

सोलापूरच्या महिलेचा विधान भवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : राज्यात महापुरुष आणि संतांचा खुलेआम अपमान सुरू आहे. पण, कुठलीच कारवाई होत नसल्याविरोधात संतप्त झालेल्या एका महिलेने नागपुरातील विधिमंडळाच्या समोर अंगावर ज्‍वनलशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे आज कामकाज स्थगित झाल्याने यंत्रणा काहीशी रिलॅक्स मूडमध्ये असताना अचानक खळबळ उडाली.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, अशा घोषणा देत अचानक या महिलेने विधानभवनाच्या मुख्य दारासमोर अंगावर ज्‍वनलशील पदार्थ ओतून घेतला. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या नागपूर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिला सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. ही महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करता, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता, त्यांच्या नावावर राजकारण करता… वारकरी संप्रदायाचा अपमान करता… तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही.. तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही… अशा शब्दांत या महिलेने सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

.हेही वाचा  

Back to top button