राजकारणात ताजेपणा आणण्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा : प्रकाश आंबेडकर 

Published on
Updated on

पुणे; पुढारी ऑनलाईन : मराठा आरक्षणावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत आंबेडकर यांनी संभाजीराजेंना पाठिंबा असल्याचे सांगितले. 

यावेळी त्यांनी शरद पवार यांना टोला लगावला ते म्हणाले की, नरो वा कुंजराहोच्या भूमिकेत शरद पवार असतात. ते आरक्षणासाठी लवकरच भूमिका घेतील. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी आता दोन संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका आणि ही याचिका फेटाळल्यास दुसरी याचिका दाखल करणे. 

प्रकाश आंबेडकर यांनी राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नसल्याचे ते म्हणाले. राजकारणात शिळेपणा आल्याने ताजेपणाची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत, पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जाण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले असले तरी अजनूही दोन पर्यायाने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करुन त्यामधून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा किंवा संसदेमध्ये आरक्षण द्यावे, अशी भुमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्‍त केली.

मराठा आरक्षण या विषयावर खासदार छत्रपती संभाजीराजे आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, केंद्र व राज्य शासन यांच्या 342 अ चा पर्याय अद्यापही खुला आहे. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणाबाबतची मागणी करुन राष्ट्रपती केंद्रिय मागास आयोगाचे पाठवू शकते. या आयोगाकडून संसदेमध्ये आरक्षणाची प्रस्ताव पाठवून तेथे चर्चाअंती हे आरक्षण मिळू शकते. त्यासाठी पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागेल. असा निर्णय घेतला तर मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होणार नाही. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news