जळगाव: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर एसआरपीएफ जवानाने दोन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र करतार जाधव (रा. वसंतनगर, ता. पारोळा, ह.मु.जळगाव) असे सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व जितेंद्र जाधव दोघेही जळगाव शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्यात ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१८ ते मे २०२१ या कालावधीत जितेंद्र याने जळगाव, अमरावती, पुणे व गुजरातमधील नडियाद याठिकाणी हॉटेल व लॉजमध्ये नेऊन पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. प्रत्येक वेळी लग्न करणार आहे असे जितेंद्र जाधव याने पीडित तरुणीला सांगत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. २ मे रोजी लग्न करण्याच्या तयारीने जितेंद्र जळगावात आला. यावेळी त्याने लग्नाला लागणारे काही साहित्य आणले. पण तो पुन्हा त्यानंतर मूळ गावी वसंत नगर येथे गेला. तिथून आल्यानंतर जितेंद्रने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पीडित तरुणीने शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विवाह रोखला  

शेत जमीनीसाठी नातवानं केला आजोबांचा खून

कोरोना : अल्प प्रतिसादामुळे 'या' १४ रेल्वे रद्द!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news