

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने बुधवार (ता.1) रोजी मासिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे ही बैठक केवळ चर्चात्मक होती का? असा प्रश्न देहूच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. देहू नगरपंचायत हद्दीत सुरक्षिततेसाठी फटाका स्टॉलधारकांसाठी एकाच ठिकाणी (एसटी बस स्थानकाजवळ) जागा निश्चित करून परवानगी देऊन त्याची यादी पोलिस ठाण्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. खंडित पाणीपुरवठा आणि पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदारांकडून कामे होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंद घेत परवाने देणे आणि अन्न व औषध प्रशासनाला तपासणीसाठी पत्रव्यवहार करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्ष शीतल हगवणे, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, गटनेता, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अभियंता, कर्मचारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा